राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठे , कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेली महाविद्यालये व मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी नविन परिभाषित अंशदान , निवृत्तीवेतन / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान वितरीत करणेबाबत कृषी , पशुसंवर्धन व दुग्धविकास अणि मत्स्यव्यवसाय विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.01.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .
सन 2022-23 या वर्षाकरीता राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान याकरीता लेखाशिर्ष 2071 0794 अतंर्गत अर्थसंकल्पीत निधीपैकी चार कोटी चाळीस लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास अखेर राज्य शासनाने मान्यता दिली आहे .सदरचा निधी निर्णयामध्ये नमुद केलेल्या लेखाशिर्षाखालीच खर्च करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .यामध्ये निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभ , नागरी , अनुकंपा भत्ते या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
या निर्णयामुळे राज्यातील कृषी विद्यापीठे , कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेली महाविद्यालये व मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे . या संदर्भातील कृषी , पशुसंवर्धन व दुग्धविकास अणि मत्स्यव्यवसाय विभागाचा दि.01.11.2022 रोजीचा शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रंमाक – 202211011146111301 ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !