महाराष्ट्र शासन सेवेत तलाठी पदांच्या तब्बल 4 हजार 122 पदांसाठी पदभरती प्रक्रिया संदर्भात आत्ताची मोठी नविन अपडेट समोर आलेली आहे .महाराष्ट्र शसन सेवेत तलाठी पदांसाठी पदभरती प्रक्रिया ही सन 2019 नंतर पहिल्यांदाच महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .या संदर्भातील नविन अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पुढील महिन्यांत होणार तलाठी पदांसाठी पदभरती प्रक्रिया –
बऱ्याच दिवसांपासून तलाठी पदांसाठी प्रलंबित असणारा विषय अखेर मार्गी लागणार आहे . आदिवासी भागांमध्ये पेसा अंतर्गत पदभरती प्रक्रिया संदर्भात राज्य शासनाने अखेर लेखी निर्णय घेतला असून , अनुसूचित क्षेत्रामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार इतर प्रवर्गातील देखील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे . म्हणजेच पेसा अंतर्गत पदभरती प्रक्रिया करिता लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आदिवासी प्रवर्ग , त्याचबरोबर इतर प्रवर्गातील उमेदवारांना देखील भरतीमध्ये आरक्षण देण्यात येणार आहेत .
ज्या क्षेत्रामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाची 50% पेक्षा अधिक लोकसंख्या आहे ,अशा ठिकाणी 100% तलाठी भरती अनुसूचित जमाती प्रवर्गात मधूनच भरण्यात येणार आहे . तर ज्या ठिकाणी 25 ते 50 टक्के अनुसूचित जमाती प्रवर्गाची संख्या आहे . अशा ठिकाणी 50 टक्के पदावर अनुसूचित जमाती प्रवर्गातून तर 50 टक्के पदावर इतर प्रवर्गातून पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
ज्या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या 25% पेक्षा कमी आहे , अशा ठिकाणी 25 टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात येणार आहे .महाराष्ट्र राज्यामध्ये या अगोदर तेरा आदिवासी जिल्ह्यांमध्ये 100% पदे ही अनुसूचित जमाती प्रवर्गांमधूनच भरली जात होती , परंतु आता लोकसंख्येच्या प्रमाणावर ही पदे भरण्यात येणार आहेत . म्हणजेच इतर प्रवर्गातील उमेदवारांना देखील पेसा अंतर्गत भरतीची संधी मिळणार आहे .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026