महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागांकडून विभागनिहाय गट संवर्गातील तलाठी संवर्गातील रिक्त पदांचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे .वाढत्या महसुली सर्कल व वाढती लोकसंख्येनुसार तलाठी संवर्गातील काही पदे हे नव्याने निर्माण करण्यात आलेली आहेत .
यानुसार नाशिक विभागांमध्ये आता नव्याने 689 पदे नव्याने निर्माण करण्यात आलेली असून यापुर्वीच रिक्त असणारी पदे 646 आहेत असे एकुण 1035 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . तसेच कोकण विभागांमध्ये एकुण 181 पदे रिक्त आहेत तर नव्याने 550 पदे निर्माण करण्यात आलेली असून आता एकुण 731 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
औरंगाबाद विभागांमध्ये सध्या 162 पदे रिक्त असून नव्याने 685 पदे निर्माण करण्यात आलेले आहेत असे एकुण 847 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . तर नागपुर विभागांमध्ये सध्या 102 पदे रिक्त असून नव्याने 478 पदे निर्माण करण्यात आलेली आहेत , यामुळे आता एकुण 580 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
अमरावती विभागांमध्ये रिक्त पदांचा आकडा 77 तर नव्याने निर्माण करण्यात आलेली पदांचा आकडा 106 असून आता एकुण तलाठी पदांच्या 183 जागांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येणार आहेत . तर पुणे विभागांमध्ये रिक्त पदांचा आकडा 144 तर नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पदांचा आकडा 602 असून आता एकुण 746 तलाठी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
विभागानुसार , जिल्हानिहाय तलाठी संवर्गातील रिक्त पदे व नव्याने निर्माण करण्यात पदांचा आकडा बाबत सविस्तर पदभरती जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मध्ये विविध गट क आणि ड पदांसाठी नियमित पदभरती , लगेच करा आवेदन !
- RITES : रेल इंडिया तांत्रिक व इकॉनिमिक सेवा लि.मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधी व न्याय विभाग मध्ये 5,793 जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास सुरुवात !
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !