Fact : फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Fertilisers And Chemicals Travancore Ltd. Recruitment For Varioius Post , Number of Post Vacancy – 98 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविसतर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम / ट्रेडपदसंख्या
01.फिटर24
02.मशिनिस्ट08
03.इलेक्ट्रिशियन15
04.प्लंबर04
05.मेकॅनिक मोटर व्हेईकल06
06.कारपेंटर02
07.मेकॅनिक ( डिझेल )04
08.इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक12
09.वेल्डर09
10.पेंटर02
11.कोपा12
 एकुण पदांची संख्या98

शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : केंद्रीय गृह विभाग मध्ये 3500+ जागांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 01 एप्रिल 2024 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 23 वर्षापर्यंत तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Senior Manager (Training), FACT Training and Development Centre, Udyogamandal, PIN-683501 या पत्यावर दिनांक 25 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment