केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत वैद्यकीय सेवा मध्ये तब्बल 827 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Public Service Commisson Medical Service Examination Recruitment For Medical Officer Post , Number of Post Vacancy – 827 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | केंद्रीय आरोग्य सेवा – कनिष्ठ स्केल पोस्ट | 163 |
| 02. | रेल्वे सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी | 450 |
| 03. | नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी | 14 |
| 04. | पुर्व , उत्तर , दक्षिण महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड – II | 200 |
| एकुण पदांची संख्या | 827 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे एम.बी.बी.एस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.08.2024 रोजी कमाल वय हे 32 वर्षांपर्यंत तर मागास प्रवर्ग वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेस्थळावर 30.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 200 रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026