BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये संवर्ग क पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध झालेली असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचे नावे , आवश्यक पात्रता व पदांची संख्या बाबत पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम – परिचारिका ( स्टाफ नर्स ) संवर्ग क , एकुण पदांची संख्या – 652
पात्रता – उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवार हा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने विहीत केलेला जनरल नर्सिंग ॲन्ड मिडवायफरी अभ्यासक्रम पुर्ण उत्तीर्ण केलेला असावा .तसेच उमेदवार हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेवून उत्तीर्ण असणे असणे आवश्यक आहे .
निवड प्रक्रिया – एकुण रिक्त पदांपैकी 90 टक्के पदे फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून भरण्यात येणार आहेत .तर उर्वरित 10 टक्के पदे हे बृहन्मुंबई परिचर्या शाळेतून व इतर मान्यताप्राप्त परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून भरण्यात येणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल ) या पत्त्यावर दि.21 मार्च 2023 पर्यंत पोहोचे अशा पद्धतीने पत्राद्वारे समक्ष सादर करण्यात यावे . सदर पालिका पदभरती प्रक्रिया कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !