भारतीय टपाल मेट मोटार सेवा मुंबई येथे आठवी पात्रताधारकांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mail Motor Service Recruitment for Skiled Artisans Post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
हे पण वाचा : पुणे येथे सरकारी नोकरीची उत्तम संधी !
भारतीय टपाल मेल मोटार सेवा मुंबई येथे कुशल कामगार यामध्ये मेकॅनिक , मोटार व्हेईकल इलेक्ट्रीशियन , Tyreman , टिनस्मिथ , पेंटर , ब्लॅकस्मिथ अशा पदांच्या एकुण 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर पदांकरीता उमेरवार हा संबंधित विषयात / ट्रेड मध्ये प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अथवा इयत्ता आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर मोटार वाहन मेकॅनिक पदांकरीता उमेदवारांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01 जुलै 2023 रोजी किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक तर कमाल वय 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे , यामध्ये मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये पाच तर इतर मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : सावित्रीबाई फुले विद्यापीठ मध्ये फक्त 5 वि पात्रता धारकांसाठी पदभरती !
वेतनमान – निवड झालेल्य उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार 19,900/- + इतर लागु असणारे वेतन व भत्ते अदा करण्यात येतील .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज मेल `THE SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE,134-A, SUDAM KALU AHIRE MARG, WORLl, MUMBA1-400018 या पत्त्यावर दि.13 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे .सदर भरतीसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क /फीस आकारले जाणार नाहीत !
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सफाई कर्मचारी ( वर्ग – 4 ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 190+ जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
- CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 212 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- आर्मी पब्लिक स्कुल देवळाली , नाशिक अंतर्गत सन 2025-26 करीता शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !