महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायत पातळीवर कार्यरत कोतवाल या पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .कोतवाल पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , मानधन इ.बाबत सविस्तर माहितीसाठी पदभरती जाहीरात पाहुयात ..
कोतवाल हे पद जिल्हा प्रशासन / पोलिस प्रशासन व महसुल प्रशासनातील सर्वात कनिष्ठ पद आहे , सदरचे पद हे संवर्ग चार मध्ये मोडत नसुन राज्य शासनांच्या अवर्गीकृत्त संवर्गांमध्ये मोडते .सदर पदांसाठी अर्ज सादर करण्याची उमेदवार हा किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच सदर उमेदवारास मराठी भाषा लिहीता , वाचता , बोलता येणे आवश्यक असणार आहे .
तसेच ज्या तालुक्यांमध्ये पदे रिक्त आहेत , उमेदवार त्याच तालुक्याचा रहीवाशी असणे आवश्यक असणार आहे , तसेच निवड झालेल्या उमेदवारानी शारीरिक क्षमतेबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे .सदरचे पद हे अवर्गीकृत असल्यामुळै सदर कोतवाल पदांस सेवानिवृत्ती विषयक लाभ मिळणार नाहीत .
वयोमर्यादा : कोतवाल या पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच कमाल वयोमर्यादा 40 वर्षांपेक्षा अधिक असू नयेत असे उमेदवार अर्ज सादर करण्यासाठी पात्र ठरणार आहेत .
सदर पदभरती ही तालुका एक घटक गृहीत धरुन करण्यात येत असल्यामुळे निवड होणाऱ्या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांचा कोणताही विचार न करता तालुका अंतर्गत रिक्त असलेल्य कोणत्याही ठिकाणी पदस्थापना देण्यात येईल , व तालुका अंतर्गत बदलीस पात्र असणार आहेत .
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 723 जागेसाठी महाभरती !
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !