भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये गट ब आणि क संवर्गातील 3000+ जागांसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये विविध गट ब आणि क संवर्गातील तब्बल 3,036 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत काळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( AIIMS : All India Institute of Medical Science Recruitment For Class B & C Post , Number of Post Vacancy – 3036 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक एडमिन अधिकारी , सहाय्यक डायटिशियन , सहाय्यक अभियंता , सहाय्यक लॉन्ड्री सुपरवाइजर , सहाय्यक भांडारपाल अधिकारी तसेच इतर पदे अशा गट ब आणि क संवर्गातील तब्बल 3036 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

शैक्षणिक पात्रता ( Education Qulification )  : सदर पदांस उमेदवार हे इयत्ता 10 वी / 12 वी / आयटीआय / पदवी / B.SC / MSW / इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मध्ये मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वय मर्यादा ( Age Limit ) : सदर पदांस अर्ज सादर करण्याकरीता उमेदवाराचे दि.01.12.2023 रोजी कमाल वय हे पदांनुसार 30/35/45 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . त्यात SC / ST प्रवर्ग करीता 05 वर्षे तर OBC प्रवर्ग करीता 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://creaiims.aiimsexams.ac.in/Login या संकेत स्थळावर दिनांक 01 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment