शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये वर्ग 3 व वर्ग 4 ची पदे बाह्यस्त्रोतामार्फत पदभरती GR निर्गमित !

Spread the love

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी या संस्था मधील वर्ग 3 आणि वर्ग 4 ची पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरणेबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मार्फत दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी या संस्था मधील गट क संवर्गाची 47 काल्पनिक पदे व गट ड संवर्गाची सात पदे बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करुन घेण्यासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती . यानुसार मे.साई मॅनपावर सर्विसेस जळगाव यांच्याकडून उपलब्ध करुन घ्यावयाची गट क पदांचे नावे व पदसंख्या पुढीलप्रमाणे आहेत .

वर्ग -3 मधील पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कलाकार पदांच्या 01 जागा , सहाय्यक ग्रंथपाल पदांच्या 01 जागा , कनिष्ठ लिपिक पदांच्या 10 जागा , प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या 4 जागा , इ.सी.जी तंत्रज्ञ पदांच्या 04 जागा , प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या 10 जागा , समाजसेवा अधिक्षक ( वैद्यकीय ) पदांच्या 02 जागा ,सुतार पदांच्या 01 जागा , प्लंबर पदांच्या 01 जागा , लघुलेखक ( निन्मश्रेणी ) पदांच्या 05 जागा , लघुटंकलेखक पदांच्या 02 जागा , वाहनचालक पदांच्या 02 जागा अशा एकुण 47 जागांसाठी बाह्यस्त्रोताद्वारे पदभरती करण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कलाकार01
02.सहाय्यक ग्रंथपाल01
03.कनिष्ठ लिपिक10
04.प्रयोगशाळा तंत्रज्ञ04
05.इ.सी.जी.तंत्रज्ञ04
06.क्ष किरण तंत्रज्ञ04
07.प्रयोगशाळा सहाय्यक10
08.समाजसेवा अधिक्षक ( वैद्यकीय )02
09.सुतार01
10.प्लंबर01
11.लघुलेखक05
12.लघुटंकलेखक02
13.वाहनचालक02
 एकुण पदांची संख्या47

हे पण वाचा : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 203 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

गड ड संवर्गातील पदनाम / पदांची संख्या : दप्तरी पदांच्या 02 जागा , शिपाई पदांच्या 04 जागा तर हमाल पदांच्या 01 जागा अशा एकुण 07 जागेसाठी बाह्यस्त्रोताद्वारे पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या  
01.दप्तरी02
02.शिपाई04
03.हमाल01
 एकुण पदांची संख्या07

या संदर्भात पदभरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

पदभरती शासन निर्णय (GR)

Leave a Comment