एकलव्य निवासी शाळांमध्ये प्राचार्य , शिक्षक , लेखापाल ,कनिष्ठ सहाय्यक , परीचर पदांच्या तब्बल 4026 जागांसाठी महाभरती ! लगेच करा आवेदन !

Spread the love

एकलव्य निवासी शाळांमध्ये प्रायार्च , शिक्षक , लेखापाल ,‍कनिष्ठ सहाय्यक , परीचर पदांच्या तब्बल 4026 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत मुदतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .

प्राचार्य : प्राचार्य पदांच्या एकुण 303 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी उमेदवार हा मास्टर्स पदवी आणि B.ED पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच Voice Principal /TGT /PGT /PGT पदांवर काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे .सदर पदांस आवेदन करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 50 वर्षांपेक्षा जास्त असू नये तर EMRS कर्मचाऱ्यांसाठी 55 वर्षांपर्यंत शिथिलता देण्यात आलेली आहे .

पदव्युत्तर शिक्षक : पदव्युत्तर शिक्षक पदांच्या एकुण 2266 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा पदव्युत्तर पदवी व B.ED व B.ED ,MSC /MCA / M.E/M.TECH किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदांस आवेदन करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 40 वर्षांपेक्षा जास्त असू नये तर EMRS कर्मचाऱ्यांसाठी 55 वर्षांपर्यंत शिथिलता देण्यात आलेली आहे .

हे पण वाचा :भारतीय पशुपालन मंडळ मध्ये तब्बल ‍3,444 पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

लेखापाल : लेखापाल पदांच्या एकुण 361 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी उमेदवार हा वाणिज्य शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदांस आवेदन करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 40 वर्षांपेक्षा जास्त असू नये तर EMRS कर्मचाऱ्यांसाठी 55 वर्षांपर्यंत शिथिलता देण्यात आलेली आहे .

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक : कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांच्या एकुण 759 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व इंग्रजी 35 व हिंदी 30 शब्द प्र.मि. टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदांस आवेदन करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा जास्त असू नये तर SC/ST/OBC / EMRS कर्मचाऱ्यांसाठी 55 वर्षांपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे .

हे पण वाचा : पदवीधरांना सरकरी नोकरीची आत्ताची मोठी संधी!

प्रयोगशाळा परिचर : प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकुण 373 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी / लॅबोरेटरी तांत्रिक डिप्लोमा किंवा 12 वी पास असणे असणे आवश्यक आहे .सदर पदांस आवेदन करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा जास्त असू नये तर SC/ST/OBC / EMRS कर्मचाऱ्यांसाठी 55 वर्षांपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली शैक्षणिक पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खालील प्रमाणे दिनांक 30.07.2023 पर्यंत आवेदन करावेत ..

1. प्राचार्य पदांसाठी Apply Now

3.लेखापाल / कनिष्ठ सहाय्यक / प्रयोगशाळा परिचर पदांसाठी Apply Now

2.पदव्युत्तर शिक्षक पदांसाठी Apply Now

सदर पदांकरीता आवेदन करण्यासाठी अमागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता प्राचार्य पदांकरीता 2000/- रुपये , पदव्युत्तर शिक्षक पदांकरीता 1500/- रुपये , लेखापाल / कनिष्ठ सहाय्यक / प्रयोगशाळा सहाय्यक पदांकरीता 1000/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरतीा आवेदन शुल्क आकारली जाणार नाहीत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment