महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेतील गट क संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित सूचना निर्गमित करणेबाबत ग्राम विकास विभागांकडून दि.09 मे 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .यानुसार जिल्हा परिषदेमधील (maharashtra zp megabharati ) रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आली असून सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
जिल्हा परिषदेमधील रिक्त पदे हे प्रकार अ , प्रकार ब व प्रकार क अशा विभागणी द्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . प्रकार अ मध्ये नमुद पदांसाठी मराठी , इंग्रजी , सामान्यज्ञान , बुद्धीमत्ता व गणित या विषयांसाठी एच.एस.सी व समकक्ष दर्जा नमुद करण्यात आलेला आहे . प्रकार अ मध्ये आरोग्य सेवक , औषध निमार्ण अधिकारी , कनिष्ठ अभियंता , कनिष्ठ आरेखक , कनिष्ठ सहाय्यक , पशुधन पर्यवेक्षक , रिंगमन , लघुलेखक , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा पदांचा समावेश करण्यात आलेला आहे .
तर प्रकार ब मध्ये आरोग्य पर्यवेक्षक , कनिष्ठ लेखाधिकारी , प्रयोगशाहा तंत्रज्ञ , वरिष्ठ सहाय्यक , विस्तार अधिकारी अशा पदांचा समावेश करण्यात आलेला आहे . सदर पदांकरीता मराठी , इंग्रजी या विषयांसाठी एच.एस.सी दर्जा व सामान्यज्ञान , बुद्धीमापन व गणित या विषयांसाठी पदवी व समकक्ष दर्जा नमुद करण्यात आलेला आहे .
हे पण वाचा : राज्यातील महानगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायती मध्ये 40 हजार पदांसाठी मेगाभर्ती 2023
तर प्रकार क मध्ये आरोग्य पर्यवेक्षक , आरोग्य सेवक , कंत्राटी ग्रामसेवक , कनिष्ठ अभियंता , जोडारी , तारतंत्री , पशुधन पर्यवेक्षक , वरिष्ठ सहाय्यक , विस्ताार अधिकारी स्थापत्य अभियांत्रिकी अश पदांचा समावेश प्रकार क मध्ये करण्यात आलेला असून सदर संवर्गातील पदांकरीता तांत्रिक अभ्यासक्रम दर्जा नमुद करण्यात आलेला आहे .
या संदर्भातील अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा करण्यात आलेला ग्रामविकास विभागाचा दि.09.05.2023 रोजीचा सविस्तर पदभरती शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील नमुद लिंकवर क्लिक करावे .
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- नमो महारोजगार मेळावा : विविध पदांच्या तब्बल 10,000+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र जिल्हा न्यायालय मध्ये तब्बल 5,793 जागेवर लघुलेखक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / हमाल पदांकरीता महाभरती !