राज्यातील महानगरपालिका मध्ये विविध संवर्गातील पदांच्या 40 हजार जागांसाठी महाभर्ती 2023 !

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील पालिका प्रशासनातील पदे भरण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पदभरती  , प्रक्रिया , पदांचे नावे , पदांनुसार आवश्यक पात्रता , निवड प्रक्रिया , विभागीय परीक्षा , परीक्षेचे वेळापत्रक , प्रशिक्षण , परीक्षेचा अभ्यासक्रम या संदर्भात सुधारित आकृतीबंधानुसार पदभरती शासन निर्णय दि.02 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

महानगरपालिका पालिकेच्या आयोजित परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येकी प्रश्नपत्रिकेच्या एकुण गुणांच्या किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक असणार आहे .तसेच सदरची रिक्त पदांसाठी विभागीय परीक्षा व मराठी भाषा परीक्षा या सक्षम प्राधिकारी यांनी विहीत केलेल्या अभिकरणाकडून सर्वसाधारणपणे दरवर्षी प्रशासनाच्या / अभिकरणाच्या सोयीनुसार सदरची परीक्षा ही मे ते जून महिन्यात घेण्यात येणार आहेत .

काही पदांसाठी विभागीय परीक्षा घेण्यात येणार आहेत , यांमध्ये प्रशासकीय सेवा मधील अधिकक्षक , लेखा विभागातील लेखाधिकारी , लेखा परिक्षण विभागातील उपमुख्य लेखापरीक्षक , तसेच आरोग्य सेवा मधील स्वच्छता निरीक्षक तर अग्निशमन सेवा मधील सहाय्यक अग्निशमन अधिकारी या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

हे पण वाचा : IOCL , इंडियन ऑइल कार्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती ! Apply Now !

यांमध्ये काही पदे ही पदोन्नती , अनुकंपा धोरण तर काही पदे ही रोजंदारी कर्मचाऱ्यांमधून भरण्यात येणार आहेत , अशा उमेदवारांना परीक्षा उत्तीर्ण होण्यामधून सुट देण्यात निर्णय घेण्यात आला आहे .यांमध्ये काही पदे विभागीय परीक्षेद्वारे तर काही पदे हे सरळसेवा पद्धतीने तर संवर्ग ड मधील पदे ही बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत .

या संदर्भात पदनिहाय आवश्यक पात्रता , परीक्षेचे स्वरुप , अभ्यासक्रम , प्रशिक्षण इत्यादी बाबतीत सविस्तर माहितीसाठी खालील सविस्तर पदभरती शासन निर्णय पाहा

पदभरती शासन निर्णय

Leave a Comment