महाराष्ट्र शासन सेवेत बाह्य यंत्रणा / कंत्राटी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , यामध्ये प्रामुख्याने मनुष्यबळाच्या वर्गवारीनुसार पदांची भरती करण्यात येणार आहे . याकरीता बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरवठा करण्याकरीता एजन्सींचे / संस्थांचे पॅनल तयार करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात आलेली आहे .
अतिकुशल कामगारांमध्ये प्रकल्प अधिकारी / व्यवस्थापक ,सहाय्यक प्रकल्प अधिकारी / व्यवस्थापक , वरिष्ठ अभियंता , कनिष्ठ अभियंता , लेखापाल , विधी अधिकारी ,अधिक्षक , शिक्षक ,अशा तांत्रिक पदांचा समावेश अतिकुशल कामगारांमध्ये करण्यात आलेला आहे . सदर पदांकरीता 31,500/- रुपये ते 195,784 इतके वेतन मिळणाार आहेत .
कुशल कामगारांमध्ये सहाय्यक विधी अधिकारी , सहाय्यक शिक्षक , कोर्स सहाय्यक , ड्राफ्टसमन , वरिष्ठ लिपिक , बँक को -ऑर्डिनेटर ,कनिष्ठ लिपिक , कनिष्ठ लेखापाल , तालुका को-ऑर्डिनेटर , स्वय सहाय्यक अशा पदांचा समावेश करण्यात आलेला आहे . सदर पदांकरीता 32800/- रुपये ते 92,200/- रुपये प्रतिमहा पगार मिळणार आहे .
अर्धकुशल कामागारांमध्ये केअर टेकर , वरिष्ठ माळी , भांडारपाल , माळी , कारपेंटर , हाऊस किपींग स्टाफ अशा पदांचा समावेश करण्यात आलेला असून सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून , सदर पदांकरीता प्रतिमहा 25,000/- ते 32,800/- रुपये पगार मिळणार आहे .
अकुशल कामगारांमध्ये सफाईगार , परिचर , ड्रेसर , शिपाई , लेबर , मेसेंजर , मदतनिस अशा पदांचा समावेश करण्यात आलेला असून , सदर पदांकरीता कोणत्याही शैक्षणिक पात्रतेचे आवश्यक असणार नाही , परंतु शिपाई पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता 25,000/- रुपये ते 29,800/- प्रतिमहा पगार मिळणार आहे .
पदांनुसार आवश्यक पात्रता , वेतनमान , व शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील पदभरती शासन निर्णय डाऊनलोड करा .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !