महाराष्ट्र शासन सेवेत कंत्राटी पद्धतीने विविध पदांच्या तब्बल 75,000 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या बाबत राज्य उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून दि.14 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित झालेला आहे . या निर्णयानुसार राज्य शासन सेवेत तब्बल 75,000 पदांवर कंत्राटी / बाहृयस्त्रोताद्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .सविस्तर पदभरती तपशिल पुढील प्रमाणे पाहुयात .
भारताला स्वातंत्र्य होवून 75 वर्षे पुर्ण झाल्याने , संपुर्ण भारतामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त विविध योजना / उपक्रम राज्य शासनांकडून राबविण्यात येत आहेत . राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या अमृतमहोत्सव निमित्त महाराष्ट्र शासन सेवेमध्ये तब्बल 75 हजार पदे भरण्याचा निर्धार केलेला आहे . त्या अनुषंगाने राज्य शासनांने दि.14 मार्च 2023 निर्गमित करुन तब्बल 75 हजार पदांकरीता पदभरती करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे .
सदरची पदभरती प्रक्रिया ही बाह्य यंत्रणेद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून यामध्ये पदभरती प्रक्रिया ही 1) कुशल 2) अकुशल 3) अर्धकुशल 4) अतिकुशल अशा चार गटात पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . सदर पदभरती शासन निर्णयांमध्ये गटांनुसार पदांची नावे देण्यात आलेले आहेत .
राज्य शासनाच्या या पदभरती प्रक्रिया बाबतच्या निर्णयांमुळे राज्यातील तब्बल 75 हजार बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .पदानुसार आवश्यक पात्रता (Education Qualifications) , वेतनश्रेणी (Payment ) याबाबत खालील सविस्तर जाहिरात पाहा !
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !