महाराष्ट्र राज्यातील सर्वच नगरपरिषदा / नगरपंचायती मध्ये विविध गट क व गट ड संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया संदर्भात राज्य शासनांच्या नगरपरिषद प्रशासनांकडुन पदभरती प्रक्रिया परिपत्रक दि.17.04.2023 रेाजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकांमध्ये रिक्त पदांच्या पदभरती करीता परिक्षेचे स्वरुप व परीक्षेसाठी अभ्यासक्रम नियोजित करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये वरिष्ठ लिपिक , लिपिक टंकलेखक , लघु टंकलेखक , वाहन चालक , ड्रायव्हर कम ऑपरेटर ,शिपाई या पदांकरीता त्याच्या शैक्षणिक अर्हतेच्या समकक्षाच्या दर्जानुसार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील .यांमध्ये मराठी भाषा , इंग्रजी भाषा प्रत्येकी 25 प्रश्न एका प्रश्नांला दोन गुण देण्यात येईल . तर सामान्य ज्ञान , बौद्धीक चाचणी या विषयांचे प्रत्येकी 25 प्रश्न असे एकुण 100 प्रश्नांला 200 गुण देण्यात येईल .सदर पदभरती प्रक्रियेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे .
हे पण वाचा : सरकारी सेवेत तब्बल 3000+ जागांसाठी सर्वात मोठी मेगाभर्ती 2023 !
तर गाळणी चालक , प्रयोगशाळा सहाय्यक , तारतंत्री / विजतंत्री , पंप ऑपरेटर / जोडारी , वायरमन , सहायक ग्रंथपाल , उद्यान पर्यवेक्षक , व्हॉलमन , फायरमन या पदांकरीता त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष दर्जानुसार 100 प्रश्नांचे वस्तुनिष्ठ बहूपर्यायी प्रश्न विचारले जातील . यांमध्ये मराठी 15 प्रश्न – 50 गुण , इंग्रजी 15 गुण – 50 गुण , सामान्य ज्ञान 15 प्रश्न – 50 गुण , बौद्धीक चाचणी – 15 प्रश्न – 50 गुण , तांत्रिक विषयाशी संबंधित 40 प्रश्न – 80 गुण असे एकुण 100 प्रश्नांना 200 गुण देण्यात येईल . सदर पदभरती प्रक्रिया करीता कालावधी 2 तासांचा असणार आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन सेवेत पोलिस पाटील पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 !
सदर पदभरती प्रक्रिया ही सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यांमध्ये नगरपरिषदा / नगरपंचात आस्थापनेवरील गट क व गट ड संवर्गातीलच स्थायी रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
पदांनुसार आवश्यक पात्रता , पाहण्यासाठी नगरपरिषद संचालनालय कडून निर्गमित झालेले सविस्तर पदभरती परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
- मंत्रीमंडळ सचिवालय अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BOI : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 115 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- आदिवासी विकास विभागाच्या सरकारी आश्रमशाळेत कला , क्रिडा , संगणक शिक्षकांच्या 661 रिक्त जागेसाठी महाभरती .
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विमा संस्था अंतर्गत 1300+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- KVS : केंद्रीय विद्यालय व नवोदय विद्यालय अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 14967 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !