राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायत आस्थापनेवरील गट क व ड संवर्गातील 7,830 पदांसाठी मेगाभर्ती ! जाहिरात प्रसिद्ध !

Spread the love

राज्यातील नगरपरिषदा /नगरपंचायत स्थापनेवरील गट क व गट ड स्थायी रिक्त पदांची पदभरतीच्या अनुषंगाने परीक्षेसाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूपाबाबत नगरपरिषद प्रशासन संचालक यांच्यामार्फत दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी पदभरती प्रक्रिया संदर्भातील , परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे .

राज्य शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्याबाबत वारंवार आढावा घेण्यात येत आहे . दिनांक 04 मे 2022 नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेली आहेत , यानुसार वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 31. 10 .2022 नुसार दिनांक 15. 08. 2023 पर्यंत पदभरतीसाठी शिथिलता लागू करण्यात आलेली आहे .

त्यामुळे राज्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायत आस्थापने वरील गट क व गट ड च्या स्थायी रिक्त पदांची सरळसेवेने पदभरती प्रक्रियेची कार्यवाही दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी च्या शासन निर्णयानुसार दिनांक 18.08.2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नमूद करण्यात आली आहे .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

सरळ सेवेद्वारे स्थायी रिक्त भरतीमध्ये पारदर्शकता व एकसूत्रता असणे आवश्यक आहे , याकरिता संचालक स्तरावर अभ्यासक्रम , परीक्षेचे स्वरूप तयार करण्यात आलेली आहे . संचालयाकडून मंजूर आकृतीबंधानुसार सरळसेवेने पद भरती करण्यात येणाऱ्या नगरपरिषदा / नगरपंचायत आस्थापनेवरील गट क व गट ड संवर्गाच्या विविध पदांच्या सरळसेवेने पदभरती प्रक्रियेसाठी अभ्यासक्रम परीक्षेची स्वरूप सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेली आहे .

यामध्ये वरिष्ठ लिपिक ,कनिष्ठ लिपिक ,लघुटंकलेखक , वाहनचालक , ड्रायव्हर कम ऑपरेटर, शिपाई , गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक ,तारतंत्री,विजतंत्री , पंप ऑपरेटर , वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल ,उद्यान पर्यवेक्षक ,हॉलमन ,फायरमन या गट क व ड पदांसाठी मेगाभर्ती राबविण्यात येत आहेत .

अधिक माहितीसाठी खालील पदभरती जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment