राज्यात कुशल ,अर्धकुशल , अकुशल पदांच्या तब्बल 5,000 जागांसाठी महाभरती , सरकारने काढले कंत्राट!

Spread the love

राज्यांमध्ये कुशल , अर्धकुशल व अकुशल पदांच्या तब्बल 5,000 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे , याकरीता राज्य शासनांकडून कंत्राट देखिल निर्गमित कलेले आहेत .राज्यात सध्या नियमित कर्मचाऱ्यांची पदभरती सुरु आहे .

महाराष्ट्र राज्यात 5,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांची राज्यातील शासकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये कुशल , अर्धकुशल व अकुशल अशा वर्गवारीनुसार पदभरती करण्यात येणार आहे .कुशल , अर्धकुशल व अकुशल पदांचे नावे तसेच वर्गवारीनुसार देय वेतनमान  / मानधना बाबत राज्य शासनांकडून अधिकृत्त शासन निर्णय देखिल निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील वैद्यकीय तसेच दंत व आयुर्वेद तसेच होमिऑपॅथी महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये सदरचे कुशल , अकुशल व अर्धकुशल कर्मचाऱ्यांचे पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत .याकरीता मनुष्यबळ पुरवठा करणेकामी राज्य शासनांकडून कंत्राट देखिल काढले असून सदर 5,000 पदांची पदभरती करणेकामी महाराष्ट्र राज्य शासनांने तब्बल 110 कोटींचे कंत्राट खाजगी कंपनीला दिलेले आहेत .

हे पण वाचा : पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती!

सदरचे कंत्राटी पदे हे वर नमुद केल्याप्रमाणे , राज्यातील 27 शासकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये पदभरती करण्यात येणार आहेत . सदर पदभरती करीता राज्य  शासनांच्या उद्योग , उर्जा , कामगार व खनिकर्म विभागांकडून दिनांक 06 सप्टेंबर 2023 रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

या संदर्भातील बाह्यस्त्रोत / कंत्राटी पद्धतीने कोण – कोणत्या पदांसाठी पदभरती करण्यात येणार आहे ?  व सदर पदांकरीता किती वेतनमान अदा करण्यात येईल ? या संदर्भात बाह्यस्त्रोत पदभरती संदर्भातील सविस्रत शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

कंत्राटी (बाह्यस्त्रोत) शासन निर्णय

Leave a Comment