राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी ( NDA & NA ) परीक्षा 2024 अंतर्गत अधिकारी पदांच्या 400 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Defence Academy & Naval Academy Examination Recruitment For Officer Post , Number of Post Vacancy – 400 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लष्कर अधिकारी ( Army ) | 208 |
| 02. | नौदल अधिकारी ( Navy ) | 42 |
| 03. | हवाई दल अधिकारी ( Air Force ) | 120 |
| 04. | नौदल ( 10+ 2 कॅडेट एन्ट्री योजना ) | 30 |
| एकुण पदांची संख्या | 400 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : यांमध्ये पद क्र.01 करीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर उर्वरित सर्व पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतुन PCM विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये विविध पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा दिनांक 02 जुलै 2005 ते दिनांक 01 जुलै 2008 दरम्यान झाला असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर दिनांक 09 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर ST /SC/ महिला प्रवर्गातील उमेदवारांकरीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026