SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 26,146 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

कर्मचारी निवड आयोग मार्फत इयत्ता 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 26,146 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission Recruitment For GD Constable , Number of Post Vacancy – 26,146 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.BSF6114
02.CISF11025
03.CRPF3337
04.SSB665
05.ITBP3189
06.AR1490
07.SSF296
 एकुण पदांची संख्या26146

आवश्यक शैक्षणिक / शारीरिक अर्हता : यांमध्ये सदर सर्व पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच पुरुष उमेदवारांकरीता किमान उंची ही 170 से.मी ( अनुसुचित जमाती करीता 162.5 से.मी ) तर छाती 80 से.मी ( अनुसुचित जमाती प्रवर्ग करीता 76/5 से.मी ) व 5 से.मी फुगवता आली पाहिजे . तर महिला उमेदवारांकरीता किमान उंची ही 157 से.मी तर अनुसुचित जमाती उमेवारांकरीता 07 से.मी सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : मुंबई ,पुणे , नागपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी !

वयोमर्यादा  ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 जोनवारी 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 23 वर्षे तर SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्ष सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31 डिसेंबर 2023 रात्री 11.00 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती करीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment