सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये विविध पदांच्या 839 जागेवर सरळसेवा पद्धतीने पदभरतीस सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 18 जुलै 2023 रोजी पदभरती शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . यापैकी काही पदे ही बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार असल्याचे सदर पदभरती शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये ग्रामीण रुगणालय दळवट ता. कळवण येथील रुगालयाकरीता वैद्यकीय अधिकारी पदांच्या 4 जागा , अधिपरिचारीका पदांच्या 03 जागा , सहाय्यक अधिक्ष्ज्ञक / कारभारी पदांच्या 01 जागा तर औषध निर्माता ( मिश्रक ) , कनिष्ठ लिपिक पदांच्या प्रत्येकी 01 अशा एकुण 10 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे .
तर बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या पदांमध्ये अधिपरिचाका , कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , क्ष – किरण तंत्रज्ञ , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई गड – ड , सफाईगार ड , वाहनचालक अशा पदांच्य एकुण 16 जागा नव्याने निर्माण करण्यात आल्या आहेत .
तर सातारा येथील नविन स्त्री रुग्णालयाकरीता एकुण 42 नियमित पदे तर एकूण 55 मनुष्यबळ संख्येच्या मर्यादेत बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे .यांमध्ये वैद्यकीय अधिकारी वर्ग अ / वर्ग ब , अधिपरिचारिक , बालरोग परिचारीका , रक्तपेढी तंत्रज्ञ , औषध निर्माता , भांडार तथा वस्त्रपाल , प्रशासकीय अधिकारी , कार्यालय अधिक्षक , कनिष्ठ लिपिक अशा पदांच्या पदभरती प्रक्रिया करीता मान्यता देण्यात आली आहे .तसेच विविध पदांच्या एकुण 55 जागेसाठी बाह्य यंत्रणेद्वारे पदभरती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर ट्रामा केअर युनिट करीता वैद्यकी अधिकारी पदांचे एकूण 08 जागा तर बाह्य यंत्रणेद्वारे 07 जागेसाठी पदभरती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .त्याचबरोबर लोहगांव ता.हवेली जि.पुणे येथील रुग्णालयांमध्ये नियमित पदांची संख्या 36 तर बाह्य यंत्रणेद्वारे पदभरतीकरीता एकूण 58 जागेसाठी मान्यता देण्यात आलेली आहे .
तसेच ट्रामा केअर तेलगांव जि.बीड यांमध्ये नियमित पदे 04 तर बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचा एकूण मनुष्यबळांची संख्या 10 एवढी आहे .तसेच उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग जि . उस्मानाबाद येथे एकूण नियमित पदांची संख्या 03 तर बाह्यस्त्रोताद्वारे घ्यावयाच्या पदांची संख्या 13 आहे . तसेच प्रत्येक श्रेणीवर्धीत उपजिल्हांकरीता नियमित पदांची संख्या 24 तर बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयांचा पदांचा आकडा 12 आहे .
तसेच उपजिल्हा रुग्णालय निलंगा जि . लातुर चे श्रेणीवर्धन केल्यामुळे एकूण 12 नियमित पदे निर्माण करण्यात येत आहेत .तर बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचा पदांची संख्या 37 आहे .
बाह्यस्त्रोतांमधील पदांची संख्या : अधिपचारिका , भोतिकोपचार तज्ञ , आहारतज्ञ , रक्तपेढी तंत्रज्ञ , क्षकिरण तंत्रज्ञ , अपघात विभाग सेवक , रक्तपेढी परिचर , शस्त्रक्रिया गृह परिचर , कक्षसेवक , सफाईगार , कनिष्ठ लिपिक , बाह्यरुग्ण लिपिक , शिपाई इ.
सविस्तर पदभरती शासन निर्णय डाऊनडोल करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत …
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !