राज्य सरकारचा मोठा निर्णय : कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 6 टक्के वाढ !

Spread the love

महाराष्ट्र राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 6 टक्के वाढ करणेबाबतचा सर्वात मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे .यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे .महागाई भत्ता वाढीचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना व कधीपासुन मिळणार आहे याबाबतची  सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात .

महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय राज्यातील एसटी कर्मचारी संदर्भात घेण्यात आला आहे .राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता वाढ मिळालेली आहे .सध्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2022 पासुन 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे . याच धर्तीवर राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्यात आला आहे .याबाबत बस महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने यांनी बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता .या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे .

राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांना सध्या 28 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो आहे , यामध्ये 6 टक्के वाढ झाल्याने आता या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे .राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे .या निर्णयामुळे एस टी कर्मचाऱ्यांकडुन राज्याचे मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहे .

Leave a Comment