राज्य शासन सेवेतील पाचव्या वेतन आयोगानुसार मंजुर वेतनश्रेणीत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2018 ते दिनांक 01 जानेवारी 2022 या कालावधीतील महागाई भत्तावाढी मंजुर करणेबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण GR दि.18.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .महागाई भत्तावाढी संदर्भातील वित्त विभागाचा दि.18.11.2022 रोजीचा सविस्तर जी.आर पुढीलप्रमाणे पाहुयात ..
जे राज्य शाासकीय व इतर पात्र कर्मचारी पाचव्या वेतन आयोगानुसार मंजुर वेतनश्रेणीमध्ये वेतन घेत आहेत , अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .त्या अनुषंगाने राज्य शासन सेवेतील जे राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पुर्णकालिक कर्मचारी अद्यापही पाचव्या वेतन आयोगामध्ये वेतन घेत आहेत . त्यांच्या मूळ वेतनावरील अनुज्ञेय भत्ता दि.01 जुलै 2018 पासुन 284% वरुन 381% डी.ए वाढ करण्यात आलेली आहे .या कालावधीमधील महागाई भत्ता वाढीचा सुधारित दर पुढीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | महागाई भत्ता वाढीचा दिनांक | महागाई भत्त्याचा दर |
| 01. | दि.01 जुलै 2018 पासून | 284 % |
| 02. | 01 जानेवारी , 2019 पासुन | 295 % |
| 03. | दि.01 जुलै 2019 पासुन | 312 % |
| 04. | दि.01 जुलै 2021 पासुन | 356 % |
| 05. | दि.01 जुलै 2021 पासून | 368 % |
| 06. | दि. 01 जानेवारी 2022 पासून | 381 % |
सदर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिर्षखाली खर्ची टाकण्यात येते , त्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्याचे आदेश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आले आहे .सदर DA वाढीसंदभातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
