राज्य शासन सेवेतील पाचव्या वेतन आयोगानुसार मंजुर वेतनश्रेणीत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2018 ते दिनांक 01 जानेवारी 2022 या कालावधीतील महागाई भत्तावाढी मंजुर करणेबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण GR दि.18.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .महागाई भत्तावाढी संदर्भातील वित्त विभागाचा दि.18.11.2022 रोजीचा सविस्तर जी.आर पुढीलप्रमाणे पाहुयात ..
जे राज्य शाासकीय व इतर पात्र कर्मचारी पाचव्या वेतन आयोगानुसार मंजुर वेतनश्रेणीमध्ये वेतन घेत आहेत , अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .त्या अनुषंगाने राज्य शासन सेवेतील जे राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पुर्णकालिक कर्मचारी अद्यापही पाचव्या वेतन आयोगामध्ये वेतन घेत आहेत . त्यांच्या मूळ वेतनावरील अनुज्ञेय भत्ता दि.01 जुलै 2018 पासुन 284% वरुन 381% डी.ए वाढ करण्यात आलेली आहे .या कालावधीमधील महागाई भत्ता वाढीचा सुधारित दर पुढीलप्रमाणे आहे .
अ.क्र | महागाई भत्ता वाढीचा दिनांक | महागाई भत्त्याचा दर |
01. | दि.01 जुलै 2018 पासून | 284 % |
02. | 01 जानेवारी , 2019 पासुन | 295 % |
03. | दि.01 जुलै 2019 पासुन | 312 % |
04. | दि.01 जुलै 2021 पासुन | 356 % |
05. | दि.01 जुलै 2021 पासून | 368 % |
06. | दि. 01 जानेवारी 2022 पासून | 381 % |
सदर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिर्षखाली खर्ची टाकण्यात येते , त्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्याचे आदेश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आले आहे .सदर DA वाढीसंदभातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक , शिपाई , चौकीदार पदासाठी पदभरती ..
- राज्यातील खाजगी / सहकारी , अनुदानित / खाजगी शाळा महाविद्यालय अंतर्गत 1150+ जागेसाठी नोकरीची सुवर्णसंधी ..
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांच्या तब्बल 1511 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- सरकारी भरती 2024 : वाहनचालक पदांच्या एकुण 545 जागेसाठी पदभरती , अर्ज करण्यास विसरु नका ..